Click on images for read members review about company
“Space in the defined” is how I’d describe my work experience with the Malwadkar’s. I got associated with them when their design team was under construction & its been a ride uphill ever since. From being mentors to giving me a free hand with work, all of which has enabled me to understand my work better & grow as a professional.
The last seven years of working in “Malwadkar Architects” has been a great experience . I have been able to develop myself both personally and professionally .Work environment is extremely positive. As an organization it has helped me to achieve my goals and has also provided opportunities to develop my technical and leadership skills.
From the 2nd dimension to the 3rd dimension....that’s quite literally how I’d describe my work experience with Mam, not merely as an employee but as a team player I have been associated with every task assigned to me, where in not only have my concepts been groomed but also been weaved in the colourful fabric of interior design.
After joining “Malwadkar Architects” my impression about an office totally transformed . Here I not only work but learn new things everyday. Rahul Sir is not only a boss but a teacher, guide and supporter too. Since it’s a firm led by husband and wife, I feel like a family here ,where I can work, share personal problems ,get advice ,enjoy and celebrate too. We are not pressurized here for work but encouraged to work with involvement. I wish our office becomes one of the best architectural firm and I see that we are on the right track.
The culture of this firm is great and everyone I work with are amazing. The firm cares about its employees and goes above and beyond to create a positive work environment. It is life changing work environment. New ideas are encouraged and implemented. The employees and the management team are very genuine and supportive.
“माळवदकर आर्किटेक्टस” हि संस्था पुण्यातील एक नामांकित संस्था आहे. इथे मी १२ वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी करीत आहेत. माझ्या आयुष्यातील आता पर्यंतच्या प्रगतीच्या प्रवासामध्ये माळवदकर आर्किटेक्टस चा खूप मोठा वाटा आहे. व त्यासाठी सर् आणि मडम यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या आमच्या कडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार.
My application for this job was stream from my desire to work under well-established firm. Working here is encouraging my deep passion and appreciation towards architecture. Here, I started learning from every small task and hence, consciously, make sure that I give my best and learn from every single activity I do. Here am gaining the best possible education in architectural design, work towards combining my interests in architecture, and to be able to realize my dreams in the built form. I believe working in this firm is opening many doors for me in the future, maybe even progressing into Architecture as a whole. I am truly enjoying working here and believe that it will endow me with the desirable knowledge, skills and practice to pursue my career in Architecture.
“माळवदकर आर्किटेक्टस” हि संस्था पुण्यातील एक नामांकित संस्था आहे. इथे मी अडीच वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी करीत आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी श्री राहुल माळवदकर आणि सौ मीनल माळवदकर आम्हाला कायमच प्रोत्साहन देतात. त्याच्यामुळे आम्हाला खूप गोष्टी शिकण्यास मिळाल्या.
A decade & the transition from a humble town boy to an experienced professional have been possible due to the guidance of Ar. Rahul Malwadkar. I am grateful to Sir for taking me under his wings & grooming me with his unique & simplistic ways which has enabled me to emerge as a more confidant professional in this competitive arena. I’ve had the opportunity to work on various drawing types which have enable me to develop my skills & with his guidance & my sincerity & hard work I look forward to accomplishing very many milestones in the future.
“माळवदकर आर्किटेक्ट” या फर्म मध्ये नोकरी करत असताना श्री राहुल सर् यांचा, त्यांच्या कामाबद्दल असलेला अनुभव व कुशलता आणि त्या कुशलते मध्ये माझ्या सारख्या नवशिक्या व्यक्तीस सामावून घेतले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. व आपल्या कार्याचा रथ प्रगती पथावर नेण्याचा त्यांचा निश्चय वाखाणण्याजोगा आहे.
माझ्यावर विश्वास ठेऊन मला आपल्या कंपनीमध्ये जॉईन करून श्री राहुल सरांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याची सदैव प्रयत्न करीत राहीन. केलेल्या कामाचा आणि वर्तणुकीचा विचार करून पुरस्कार देऊन माझे जे कौतुक केले ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यामुळे अजून चांगले काही करण्यासाठी उत्साह, हुरूप, प्रेरणा घेऊन सदैव प्रयत्न करीत राहीन. श्री राहुल सर् सदैव सर्वांना बरोबर घेऊन प्रोत्साहन देऊन “माळवदकर आर्किटेक्टस” या संस्थेची प्रगतीची वाटचाल करीत आहेत. त्यामध्ये मी माझा खारीचा वाटा देण्याचा सदैव प्रयत्न करीत राहीन.
मी सन २००८ मध्ये १२ वीची परीक्षा संपल्यानंतर लगेच “माळवदकर आर्कीटेक्टस” या कंपनीमध्ये कामाकरिता आलो. माझे मामा श्री भरत मळेकर यांच्या मदतीने मला कामावर ठेवण्यात आले होते. मी मुळात गावाकडील असल्यामुळे शिक्षण माझे तसे कमी होते. पण या ऑफिसमध्ये कामाला लागल्यापासून मला काका सर्, राहुल सर व मीनल मडम यांच्याकडून भरपूर काही शिकता आले. तसेच मी कामाला रुजू झाल्यापासुनचे ऑफिसमधील माझे मित्र व मैत्रिणीकडून तसेच माझे मामा श्री भरत मळेकर यांनी चांगली मदत केली. मला आता या ऑफिसमध्ये ०९ वर्षे पूर्ण होतील अन माझा हा पहिलाच जॉब आहे. आता मी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या ठिकाणी पुनर्वसन योजनेचे कामकाज पाहतो. श्री राहुल सर् यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे मी प्रगती करू शकलो त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो.
“माळवदकर आर्कीटेक्टस” या फर्ममध्ये गेल्या ९ वर्षापासून कार्यरत असून ऑफिसमधील सर् व मडम यांचे कायमच मला सहकार्य राहिले आहे. त्यामुळे काम करत असताना समाधान वाटते. अशीच शेवटपर्यंत सर् व मडम यांची साथ व सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो.
Employee to extended family is how I feel working with this organization. Its been a learning experience working with Rahul Sir. Under his guidance I’ve developed my liasoning & technical skills. From working solely on SRA projects to handling multiple scale PMC projects the journey has been an enriching experience. I feel like an employee without a boss in this organization as my boss is more like a mentor or guru than a senior.
जून १९९४ ला गावाहून येऊन कंपनीत जॉईन झालो. सगळ काही नवीन होत. काहीच कळत नव्हत. बसन प्रवास कसा करायचा तेही कळायचं नाही. राहण्याची सोय नव्हती. कारण गावाहून पुण्यात राह्णारे नातेवाईक नसलेला मी एकटाच परंतु माझी राहण्याची सोय काकासर, भाई व मीनलताई यांनी ऑफिसमध्येच केली. मला या ऑफिसमध्ये चांगला माणूस घडवणारी माणस मिळाली. मला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन दिले. अगदी घरच्यासारखे माझ्या वर लक्ष दिले. त्यांनी कधी स्टाफ आणि बॉस असा भेदभाव केला नाही. सध्या मी लायाझनिग ऑफिसर म्हणून पी.एम.सी. मध्ये ऑफिसची सर्व कामे पाहतो. मला माझी कंपनी खूप मोठी झालेली पाहायची आहे बस......
मी शिवाजी मळेकर, माळवदकर या संस्थेमध्ये गेली १० वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी करीत आहे. माळवदकर आर्कीटेक्टस हि संस्था माझ्यासाठी केवळ एक नोकरी करण्याचे ठिकाण नसून मला माझे कुटुंबच असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे मला इथे माझे स्वत:चेच काम करीत असल्याचा अनुभव येतो. माळवदकर आर्कीटेक्टसचे सर्वेसर्वा श्री राहुल माळवदकर साहेब यांचे मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे मी आज पर्यंतच्या माझ्या आयुष्यात चांगली प्रगती करू शकलो आहे. श्री राहुल सर् माझ्यासाठी एक आदर्श व प्रेरणास्थान आहेत.
“माळवदकर आर्कीटेक्टस” या फर्ममध्ये गेल्या ९ वर्षापासून कार्यरत असून ऑफिसमधील सर् व मडम यांचे कायमच मला सहकार्य राहिले आहे. त्यामुळे काम करत असताना समाधान वाटते. अशीच शेवटपर्यंत सर् व मडम यांची साथ व सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो.
“माळवदकर आर्कीटेक्टस” या ऑफिस मध्ये गेले अडीच वर्षे काम करीत आहे. काम करत असताना मी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू ठेवले. त्यासाठी मला माझे सर् श्री राहुल माळवदकर तसेच सौ मीनल माळवदकर यांनी माझ्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यामुळेच मी बी.ए. ची पदवी मिळवू शकलो. मी माझी प्रगती अजून अशीच चालू ठेवावी यासाठी ते मला प्रोत्साहन देत असतात. आपल्या ऑफिसमध्ये मी अजून कशाप्रकारे शिक्षण घेता येईल यासाठी मला ते वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती देत असतात. माझी प्रगती कशी होईल यासाठी वेळाल वेळ काढून ते मला मार्गदर्शन करत असतात. याच ऑफिसमध्ये अजून चांगले काम करता येईल यासाठी मी प्रयत्न करत राहील. या ऑफिसमध्ये जोइन झाल्यापासून माझ्या आयुष्यात एक वेगळीच प्रगतीची दिशा प्राप्त झालेली आहे.
मी मंगेश मराठे “माळवदकर आर्किटेक्ट” या ऑफिसमध्ये गेले चार वर्षे काम करत आहे. मला काम करून कॉलेज करायचे होते. त्यासाठी सरांनी व मडम नी शिक्षणासाठी कधीही ना हरकत दाखविली नाही. उलट अजून पुढचे शिक्षण पूर्ण कर त्यासाठी ते मार्गदर्शन करत असतात. आणि माझ्या आयुष्यात मी अजून प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. जर मला शिक्षणासाठी काही अडचणी असतील तर ते मदत करत असतात. मी या ऑफिसमध्ये कामाला राहिल्यापासून माझ्या जीवनात खूप अमूलाग्र बदल झाला आहे. माळवदकर आर्कीटेक्ट या ऑफिसमध्ये काम करताना खूप आनंद वाटतो कि सर् आणि मडम कधीही ओरडले नाही उलट काम कमी वेळात कसे पूर्ण करायचे ते शिकविले. अन थोडक्यात सांगायचे झाले तर आम्ही सर्व स्टाफ एक कुटुंबाचा भाग असल्यासारखे वागत असतो. माळवदकर आर्कीटेक्ट या ऑफिसमध्ये काम करण्यात जो आनंद आहे तो इतर कुठल्याही ऑफिस मध्ये मिळणर नाही.
माझ्या द्दृष्टीने ऑफिस हि जागा अविस्मरणीय आहे कि जिथे श्री राहुल सरांनी मला घडवून आत्ताच्या लेवल पर्यंत आणून ठेवले आहे. करियर मधल्या झिरो पासून आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये माझ्या ऑफिसचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आम्हाला समजून उमजून आमची शैक्षणिक पात्रता समजून श्री राहुल सरांनी आम्हाला घडविण्यासाठी खूप मदत केली आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी ते आम्हला नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करणार.
मी संजय काशिनाथ शिंदे (मोटार सारथी) ड्रायव्हर म्हणून आपल्या फर्म मध्ये १९-०५-२००१ रोजी दाखल झालो. “ड्रायव्हर भाय अन हिसाब नाय” या फर्ममध्ये दाखल होण्यापूर्वी माझी वागणूक अशीच होती. पण आपल्या फर्ममध्ये आल्यापासून शिस्त लागली. कोणा बरोबर कसे वागावे, कसे बोलावे हे समजले. १५ वर्षे आपल्या सेवेत राहून एकत्र कुटुंबात राहत असल्याचा अनुभव येतो. सर व मडम दोघेही मला सांभाळून घेतात. अडीअडचणीला मदत करतात. हे दोघेही माझे मालक नसून पालकच आहेत. कामावर आल्यापासून जर काही चुका झाल्यास समजून घेतात. इथला स्टाफ देखील खूप चांगला आहे. मी स्टाफला देखील लहान (मी वयाने मोठा असल्यामुळे) मुलामुलींप्रमाणे वागणूक देतो.
मी सचिन रमेश पवार, “माळवदकर आर्किटेक्टस” या फर्ममध्ये २०१० साली रुजू झालो. या संस्थेमधील स्टाफ हा मला फार समजून घेतो. स्टाफ मध्ये व माझ्या मध्ये खेळीमेळीचे वातावरण असते. राहुल सर व मीनल मडम माझे मालक नसून पालकच आहेत. मला माझ्या नोकरी बद्दल घरच्या सारखी आपलेपणाची भावना आहे.